breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

कुदळवाडीतील महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट

  •  नगरसेवक दिनेश यादव यांनी केले विद्यार्थांचे स्वागत; मुले भारावली

पिंपरी | प्रतिनिधी

कोरोनाचा आलेख घसरणीला लागल्याने पहिली ते सातवीपर्यंतच्या खासगी आणि महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. याच अंतर्गत कुदळवाडीतील मनपा शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट दिसून आला. यावेळी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी विद्यार्थांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले . या स्वागताचे मुले अगदी भारावली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा १ डिसेंबरपासून सुरू कराव्यात, असे आदेश दिले होते. मात्र, ओमायक्रॉनचे रुग्ण पिंपरी – चिंचवड आणि पुणे शहरात आढळून आल्याने पंधरा डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर गुरुवारपासून शहरातील शाळा सुरू झाल्या आहेत. शहर परिसरात महापालिकेच्या सातवीपर्यंत १०५ शाळा आहेत. या शाळा गुरुवारपासून सुरू झाल्या.

कुदळवाडीतील मनपा शाळेमध्ये घंटानाद होऊन शाळा सुरू झाली. यावेळी नगरसेवक दिनेश यादव, शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर, तसेच प्रतिक भासरकर आदी उपस्थित होते.

  • विद्यार्थ्यांची काळजी घ्या – दिनेश यादव

दीड वर्षानंतर महापालिकेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दीड वर्ष घरात अडकून पडलेली मुले घराबाहेर पडली आहेत. शाळेत जाण्याचा आणि मित्रांना भेटण्याची उत्सुकता त्यांच्या चेहNयावर दिसून येत होती. त्यांना हा आनंद देताना त्यांची काळजी शाळेच्या घ्यावी अशा सूचना दिल्या. प्रवेशद्वारावर सॅनिटायजर होते. तेथून हँडवॉश करून मुले वर्गात येत होती. शाळांमध्ये आज सकाळी विद्याथ्र्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी वर्गसजावट केली होती. काही शाळांमध्ये मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले असे नगरसेवक दिनेश यादव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button