breaking-newsपिंपरी / चिंचवड

दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांचा सत्कार

पिंपरी, (महाईन्यूज) – श्री.  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त (दि. २३) रविवारी श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिरात पालखीच्या मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले. पालखी सोहळ्यातील वारक-यांसाठीचे सेवाकार्य आणि वृक्ष संवर्धनाचे कार्य पाहून श्रीमंत दगडुशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांचा सत्कार करण्यात आला.

उरजितसिंह शितोळे, विश्वस्त महेश सुर्यवंशी, माऊली रामभाऊ चोपदार, उपाध्यक्ष सुनील रासने, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदी सोहळ्याचे अध्यक्ष हभप माऊली कोकाटे यांच्या हस्ते  श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट यांच्या वतीने पालखीच्या मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले. यावेळी वृक्ष संवर्धन आणि पालखी सोहळा वारीला दिलेल्या सेवेबद्दल सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांचा सत्कार करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button