breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळात मतदारांची दिवाळी; पैसे वाटप करताना शिवसैनिक रंगेहात पकडले

  • शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे कार्यकर्ते

पनवेल – मावळ लोकसभा मतदारसंघात महाआघाडी आणि महायुतीच्या उमेदवारात चुरशीचे लढत पाहावयास मिळत आहे. त्यात उद्या (सोमवारी) मतदान असल्याने लक्ष्मीदर्शनाने मतदारांची दिवाळी साजरी होवू लागली आहे. पैसे वाटताना शेकापचे कार्यकर्ते सापडल्याची घटना ताजी असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्याला देखील भरारी पथकाने रंगेहात पकडल्याची घटना रविवारी घडली.

पनवेल तालुक्यातील देवद येथे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे उमेदवारी चिन्ह, मतदार यादीसह पैसे वाटताना शिवसेनेच्या संजय हिरामण पाटील या कार्यकर्त्याला निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने रंगेहात पकडले .त्याच्याकडून 26 हजार 100 रोख रक्कम सापडली आहे. खान्देशवर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती भरारी पथक प्रमुख विनोद माहोरे यांनी दिली.

दरम्यान, मावळात महाआघाडीतील शेकापच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. सुकापूर इथं मतदारांना प्रत्येकी 200 रुपये वाटत असताना पनवेल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शेकापच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडले. पनवेल भरारी पथकाने शेकाप पदाधिकाऱ्यांकडून 200 रुपयांची 29 पाकिटंही जप्त केली आहे. पैसे वाटण्याबाबत भरारी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी शेकाप कार्यकर्त्यांवर कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button