breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या स्थायी समितीकडून ६ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

  • अर्थसंकल्प विना चर्चा मंजूर, 42 उपसूचनांव्दारे 267 कोटींची वाढ 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महापालिका प्रशासनाने स्थायी समितीस सादर केलेला २०१९-२० वर्षासाठीचा अर्थसंकल्प विनाचर्चा मंजूर करण्यात आला. एकूण ६ हजार १८३ कोटींचा अर्थसंकल्पात ४२ उपसूचनांद्वारे २६७ कोटींची वाढ सुचविली आहे. स्थायी समितीने केलेल्या वाढीसह सुमारे ६ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्पास अवघ्या पाच मिनिटांत मंजुरी दिली.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील सभेत स्थायी समिती सभापतींना सुमारे ६ हजार १८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर चर्चा आणि अभ्यासासाठी स्थायी समितीने सभा २८ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब केली होती. महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात स्थायीची सभा झाली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या ४६२० कोटींच्या मूळ अर्थसंकल्पात ३० कोटी २४ लाख रुपये शिल्लक दाखविले होते. नवीन कोणताही प्रकल्प न राबविता स्मार्ट सुविधांवर आयुक्तांनी भर दिला होता. तर काही कामे मागील पानांवरून पुढील पानावर आली होती. तसेच उपसूचना स्वीकारणार की नाही? याबाबत साशंकता होती. मात्र, उपसूचना स्वीकरण्याचे धोरण सत्ताधाऱ्यांनी स्वीकारले. त्यानंतर उपसूचनांची जमवाजमव सुरू होती. आजच्या सभेत अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, सदस्यांनी आयुक्तांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले. अर्थसंकल्प चांगला आहे, असे गौरवोद्गार सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या सदस्यांनी काढले.

कोणतीही चर्चा न करता स्थायी समितीने ४२ उपसूचनांचा स्वीकार केला. या उपसूचना २६७ कोटींच्या होत्या. उपसूचनांसह ६ हजार ४५० कोटींच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे चर्चेला ठेवण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button