breaking-newsताज्या घडामोडीपुणे

येरवडा परिसरात रस्ते खोदाई

कॉमरझोन ते टिंगरेनगर रोड दरम्यान वाहतुकीस अडथळा

पिंपरी | प्रतिनिधी

येरवडा जेल जवळील कॉमरझोन पासून टिंगरेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले आहेत. गॅसच्या पाईप लाईनचे काम सुरु असल्याने हे खड्डे खोदण्यात आले आहेत. दिवसभर हे काम चालू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे.  त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

येरवडा परिसरातील अनेक भागात महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या पाईप लाईनचे काम सुरु आहे. त्यासाठी ठीकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून या भागातील अनेक रस्ते अरुंद होत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. येरवडा जेल शेजारी असणाऱ्या कॉमरझोन पासून टिंगरेनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरही महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या पाईप लाईनचे काम सुरु आहे. त्यासाठी खड्डे खोदण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदले जात आहेत. काम करणार्याकडून रस्ता बंद केला जात आहे. तसेच जेसीबी रस्त्यात लागत असल्याने इतर वाहनांना ये – जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून हि कामे सुरु करण्यात आली आहेत. मात्र अद्याप ही कामे न झाल्याने वाहनधारकांना नाहक मनस्ताप करावा लागत आहे. तसेच एक रस्ता बंद झाल्याने उलट्या बाजूने जावे लागत आहे. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या शक्यताही निर्माण होत आहेत.   

खड्डे तात्पुरते बुजविले

महाराष्ट्र नॅचरल गॅसकडून पाईप लाईनचे काम पुर्ण केल्यानंतर पाठीमागचे खड्डे बुजविले जात आहेत. मात्र हे खड्डे फक्त मातीने तात्पुरत्या स्वरूपात बुजविले जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर खडी पसरून वाहने घसरण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे खड्डे पूर्वी जसे होते तसेच करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत. या बाबत संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या

कामगार नगर परिसरात देखील गॅसकडून पाईप लाईनचे काम सुरु आहे. या ठिकाणी खड्डे खोदताना पाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर आले होते. दोन दिवसापूर्वी हि घटना घडली. मात्र गॅसकडून पाईप लाईन करणाऱ्या कर्मचार्यांनी त्वरित पाण्याची पाईपलाईन दुरुस्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button