ताज्या घडामोडीमुंबई

राणे पिता-पुत्रांना न्यायालयाचा दिलासा; १० मार्चपर्यंत अटक न करण्याचा आदेश

मुंबई |  केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना दिंडोशी न्यायालयाने आज दिलासा दिला. १० मार्चपर्यंत त्यांना अटक करू नका, असा अंतरिम आदेश मुंबई पोलिसांना दिला. नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात दिशा सालियन प्रकरणात बदनामीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी उद्या ५ मार्चला दुपारी १ वाजता ते दोघे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तर नितेश राणे यांनी सोशल मीडियावर काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी राज्य महिला आयोग आणि मालवणी पोलिस ठाण्यात नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी राणे पिता-पुत्रांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी वेळ वाढवून मागितली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने नारायण राणे आणि नितेश राणे यांना १० मार्चपर्यंत अटक करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई पोलिसांना दिला. त्यामुळे राणे पिता-पुत्रांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button