breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन गुरुवारी (दि. २०) रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अरुण पवार यांनी दिली. यावेळी प्रभाग स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, माधव मनोरे, मारुती बानेवार उपस्थित होते.   
या कार्यक्रमास कामगार मंत्री संभाजी निलंगेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार सुजितसिंह ठाकूर, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे,  शांतीलाल मुथा, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर,  आमदार लक्ष्मण जगताप, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पीएमआरडीचे किरण गित्ते, शहराचे महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड उपस्थित राहणार आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये मराठवाडा भूषण जीवन गौरव पुरस्कार डॉ. भाऊसाहेब जाधव, प्रशासकीय – मधुकर तेलंग, सामाजिक –  भूषण कदम, वैद्यकीय – डॉ. रमाकांत जोशी, वृक्षसंवर्धन अण्णा जोगदंड यांना गौरविण्यात येणार आहे.
दरम्यान, डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांचे मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच कृष्णाई उळेकर यांचा मराठवाडयाची लोककला हा सांस्कृतीक कार्यक्रम सादर होणार आहे.  मराठवाड्यातील नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button