breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी बुटापासून वंचित

स्थायीच्या सदस्यांक़डून नाराजी व्यक्त

पिंपरी- शाळा सुरु होऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी बुटापासून वंचित असल्यामुळे शिक्षणविभागाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांच्या कामाबद्दल स्थायीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त करून संताप केला.

महापालिकेच्या शाळेतील साहित्य वाटप, पटसंख्या, गुणवत्ता अशा विविध विषयांवरून शिक्षण विभाग सातत्याने गाजला आहे. या विभागाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांच्याकडे सद्या प्रशासकीय जबाबदारी असल्याने त्यांनी जबाबदारीने वागावे, सन्मानीय सदस्य,नगरसेवकांचे फोन उचलून, त्यांना उत्तरे द्यावीत, त्यांना काही विचारल्यास त्यांनाच त्यांच्या विभागाची माहिती नसते असे आरोप स्थायीचे सदस्य सागर आंघोळकर यांनी केला.

मागील काही महिन्यांपासून महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बुटसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र पुरवठा आदेशन नसल्यामुळे बुट धुळखात पडून असल्याचे समोर आले आहे. संबधिंत ठेकेदाराने आयुक्तांची भेट घेऊन पुरवठा आदेश देण्याची मागणी केली होती. त्यावेळी आयुक्तांनी शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी शिंदे यांना सूचना दिल्या होत्या. मात्र अद्यापही या विद्यार्थ्यांना बुटे मिळाली नसल्याचे पुढे आले आहे. शिक्षण विभागाची आणि महापालिकेच्या शाळेत सद्या काय चालु आहे, यासंदर्भात कसलीही माहिती शिंदे यांना नसते, माहिती विचारल्यास त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरे नसतात, तसेच नगरसेवक, सदस्यांचे फोन त्या घेत नाहीत, त्यांच्या वर्तुणुकीत बदल न झाल्यास पुढील बैठकीत त्यांना बसण्यास परवाणगी देऊ नका अशी मागणी स्थायीचे सद्सय सागर आंघोळकर यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button