breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कामगार मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबीयांना १० लाख अर्थसहाय्य द्या’; काशिनाथ नखाते

मुंबई विरार एस.टी.पी. दुर्घटना प्लांट आणि अर्नाळा पोलीस स्टेशनला भेट देऊन माहिती घेत कारवाईची केली मागणी

पिंपरी | महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी कामगारांचे जीवन असुरक्षित असून दैनंदिन कामावरती होणाऱ्या अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक वाढलेले आहे . यात प्रामुख्याने तळवडे पिंपरी चिंचवड येथे, नागपूर येथील सालार कंपनी, औरंगाबाद कंपनी अशा विविध कामगारांचे मृत्यू झालेले असताना आता दि.९ एप्रिल रोजी विरार वसई येथील ४ कामगार मृत्यू व अशा गंभीर घटना घडत आहेत मात्र सरकारचे पूर्णतः कष्टकरी कामगारांकडे दुर्लक्ष झालेले आहे. मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबीयांना दहा लाखाच्या अर्थसहाय्य द्यावे, मुख्यमंत्री,कामगार मंत्र्यांनी कामगाराकडे लक्ष देऊन त्यांना सुरक्षा योजना चालू करावी अन्यथा लवकरच मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज दिला.

ऐन पाडव्याच्या दिवशी दि. ९ रोजी महाराष्ट्र राज्यातील जनता गुढीपाडवा सण साजरा करत असताना ४ कामगारांचा मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे.

हेही वाचा     –    ‘मावळ मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार माझे नातेवाईक’; खासदार श्रीरंग बारणे 

विरार पश्चिम येथील एसटीपी प्लांट मधील मध्ये कामगार काम करण्यासाठी गेले शुभम पारकर, निखिल घाटाळ, सागर तेंडुलकर, अमोल घाटाळ अशी मृत कामगारांची नावे आहेत. पॉलीकॉम् नावाच्या कंपनीमार्फत एसटीपी प्लांट ची साफसफाई करण्याचे काम सुरू असताना ही घटना घडल्याची समजते वास्तविक कामगारांची सुरक्षा करण्याचे काम संबंधित कंपनी ठेकेदार कामगार हा यांची जबाबदारी असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे. त्यांचेकडून काम करून घेत असताना अक्षम्य चुका झालेल्या आहेत. त्यामुळे संबधित मालक, ठेकेदार आणि संबधित सर्व दोषी यांच्यावरती सदोष मनुष्ववधाच्या गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयाचे अर्थसहाय्य करण्यात यावे. तसेच कष्टकरी कामगार अपघाती मृत्यूसाठी विमा योजना त्वरित सुरू करावी. अन्यथा कामगार आयुक्त यांचे कार्यालयासमोर लवकरच आंदोलनाचा इशारा नखाते यांनी दिला आहे आज विरार येथे कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे पदाधिकारी यांनी घटनास्थळी व पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे याबाबत सकारात्मक कार्यवाही करू असे सांगण्यात आले. निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, मुंबई कार्याध्यक्ष अनंत कदम, माधुरी जलमुलवार ,सलीम डांगे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button