breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

मनसे उमेदवार रुपाली पाटील यांना साता-यातून धमकी, पोलीस संरक्षणाची मागणी

पुणे / महाईन्यूज

मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साताऱ्यातून फोन करत एका अज्ञात व्यक्तीने पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत धाव घेतली आहे.

रुपाली पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरल्या आहेत. मनसेकडून त्या निवडणूक लढवत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर अशा भागांना भेटी देऊन पदवीधरांशी संवाद साधून त्या प्रचार करत आहेत. अशातच पाटील यांना फोन करुन एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

अज्ञाताविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. तसंच धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने रविवारपासून रुपाली पाटील ठोंबरे सातारा दौऱ्यावर आहेत. अशावेळी धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी मी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी धमकीनंतर व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button