ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

‘इडीची किंमत राज्यातील शेतकऱ्याच्या विडीपेक्षाही कमी’; धनंजय मुंडेंचा घणाघात

जळगाव| राज्याचे सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या केंद्र सरकार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. कुणासाठीही कधीही आणि कारण नसताना वापर केल्यामुळे ईडीची आमच्या राज्यातील शेतकऱ्याच्या विडीपेक्षाही किंमत कमी झाली असल्याचा टोला मंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला.

मागील अडीच वर्षात यांनी काय वापरले नाही?, ईडीची तर चवच गेली. शेतकऱ्याच्या विडीची किंमत तरी जास्त आहे, मात्र ईडीची किंमत नाही. इतके सगळे करूनही ते महाविकास आघाडीच्या सरकारला काहीच करता
भाऊ ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे  म्हणाले ते खरे आहे. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीताकद तर आहेच. भाऊ आल्यानंतर तर ती ताकद द्विगुणित झाली आहे. मात्र ही ताकद आकड्यात दिसायला हवी. ती आमदारांच्या आकड्यात दिसली पाहिजे, ती खासदारांच्या आकड्यात दिसली पाहिजे, ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आकड्यात दिसली पाहिजे, ती नगरपालिकेच्या आकड्यात दिसली पाहिजे, महानगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या आकड्यात सुद्धा दिसली पाहिजे, असे आवाहन मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

केंद्र सरकार सीबीआयच्या चौकश्या लावून थकले, आयकर विभाग मागे लावून थकले, याबरोबरच ईडीचा गैरवापर करून महाआघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारने केला. मात्र यांचे हे सर्व प्रयत्न असफल ठरले, असे सांगत धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button