breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे
Breaking News : पुण्यातील शाळा बंदच ठेवणार : महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे । प्रतिनिधी
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा बंदच ठेवण्यात येतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापौर मोहोळ म्हणाले की, पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला असून येत्या १३ डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांशी चर्चा करुन आणि कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.