ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

वीज अंगावर पडून एका मेंढपाळासह १० मेंढ्या जागीच ठार, चौघे जखमी

सांगली | वीज अंगावर पडून एका मेंढपाळासह १० मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत. तर, या दुर्घटनेत चार मेंढपाळ गंभीर जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या नांगोळे येथील नरळे वस्तीवर ही घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे नरळे वस्तीनजीक वीज पडून एक शेतकरी व त्यांची दहा मेंढरे जागीच ठार झाली आहेत. सायंकाळच्या सुमारस ही घटना घडली आहे. या घटनेत रामचंद्र पांडुरंग गडदे (वय- ४५, राहणार,नांगोळे ता.कवठेमहांकाळ) यांचा मृत्यू झाला आहे.

रामचंद्र गडदे हे आपली मेंढरे घेऊन चरवण्यासाठी गावातील नरळे वस्तीवर असणाऱ्या शिवारात गेले होते. तसेच अन्य मेंढपाळ देखील याठिकाणी आपल्या मेंढ्या चरवण्यासाठी आले होते. मात्र अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर हे सर्व जण आपल्या मेंढ्या घेऊन घरी परतू लागले असताना अचानक रामचंद्र गडदे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर वीज येऊन पडली, ही वीज मेंढयांच्याबरोबर रामचंद्र गडदे यांच्या अंगावर ही पडली,ज्यामध्ये रामचंद्र गडदे (४५) हे जागीच ठार झाले, त्याचबरोबर त्यांच्या पाच मेंढ्याही ठार झाल्या आहेत.

दरम्यान, त्यांच्या बरोबर असणाऱ्या भगवान किसन नाईक या मेंढपाळच्या कळपावरही वीज पडली. यामध्ये नाईक आणि त्यांच्या सोबत असणारे गणेश नामदेव गडदे (४८), आप्पासो पांडुरंग यमगर (४७) आणि गणपती महादेव गडदे (५१) हे जखमी झाले. तर या दुर्घटनेत नाईक यांच्या ५ मेंढ्या ठार झाल्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button