breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक

मुंबई – ‘टॉप्स सिक्युरिटी’ या समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यानंतर याप्रकरणी ईडीने आज पहिली अटक केली असून सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चांदोळे हे टॉप्स समूहाचे भागीदार आहेत. अमित चांदोळे याच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टॉप्स सिक्युरिटी या खासगी कंपनीशी संबंधित अमित चांदोळे यांना अटक केली आहे. आर्थिक अनियमितता असल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 12 तासांच्या चौकशीनंतर अमित यांना अटक करण्यात आली आहे. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय समजले जातात.

दरम्यान, ईडीने मंगळवारी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वारंटाईन राहावे लागत असल्याने पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलवा, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीला केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button