breaking-newsपुणे

भीमसैनिकांचे विजयस्तंभाला अभिवादन ; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कोरेगाव – कोरेगाव भीमा नजीक पेरणे फाटा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या गाड्या शिक्रापूर येथील वाहनतळावर थांबवण्यात येत आहेत. यानंतर शिक्रापूर ते कोरेगाव भीमा या नऊ किलोमीटरच्या अंतरामध्ये बसगाड्यांनी अनुयायीना नेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे मागच्या वर्षी संवेदनशील ठरलेल्या कोरेगाव- भीमा सणसवाडी शिक्रापूर या गावांमधील नऊ किलोमीटरचा रस्ता निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून येत होते.

या रस्त्यावर केवळ पोलिसांच्या धावणाऱ्या गाड्या वाजणारे सायरन आणि भीम अनुयायांना घेऊन जाणाऱ्या बसेस दिसून येत होत्या. शिक्रापूर येथील एलएनटी फाट्यावर २५ एकरमध्ये वाहनतळ उभारण्यात आले आहे.

मुख्यतः विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर आणि मुंबई या भागातून येणारे भीमसैनिक यांना येथे थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. यामुळे सकाळपासून लाखो भीमसैनिक जमा होत होते. या ठिकाणाहून बसने त्यांना विजयस्तंभापर्यंत नेण्यात येत आहे. शिक्रापूर कोरेगाव-भीमा सणसवाडी येथील मुख्य चौकात तुरळक हॉटेल सुरू आहेत.

अहमदनगर महामार्गावरील बहुतांशी दुकाने बंद असल्याचे चित्र आहे. यामुळे कोरेगाव भीमा ते शिक्रापूर या नऊ किलोमीटर पट्ट्यात अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही अनेकांनी धोका नको म्हणून दुकाने बंद ठेवली आहेत. एकही खासगी बस अथवा दुचाकी या  रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात आल्याने सर्वांनाच बसने प्रवास करणे भाग पडत आहे. मागील वर्षीच्या झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन डोळ्यात तेल घालून दक्ष आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button