breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

लाचखोर तहसिलदार सचिन डोंगरेच्या बेहिशोबी मालमत्तेच्या चाैकशीस पथक मूळगावी पोहोचले

मोहोळ –  एक कोटी रुपयांची लाच घेणारा मुळशीचा (जि. पुणे)तहसीलदार सचिन डोंगरे याची मोहोळ येथील बँक ऑफ इंडियात चौकशी सुरु आहे. वारसा नोंदीचे प्रकरण मंत्रालयातून फेरचौकशीसाठी आल्यानंतर त्याचे निकालपत्र देण्यासाठी तसेच फेरफारअंती सातबारावर नोंद घेण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने डोंगरेला रंगेहात पकडले होते.

पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक आरोपीसह मोहोळमध्ये आले आहे. तहसीलदार सचिन डोंगरे हा काही काळ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागात कामावर होता.  तो मुळचा मोहोळ तालुक्यातील रहिवासी असल्‍याने त्‍याची मोहोळ येथील बँकेत चौकशी होत आहे.  पोलिस निरीक्षक सुरेखा घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक दिपक टेळेकर यांच्या पथकाने सोमवारी करमाळा येथे चौकशी केली असून, मंगळवारी मोहोळ येथे चौकशी केली.  दरम्‍यान, पापरी (ता. मोहोळ) या त्याच्या मुळ गावी बेहिशोबी संपत्ती आणि जमीन असल्याची माहिती समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button