breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात तरुणाई ‘दारु नको, दुध प्या’ संदेश देण्यास कटप्पा-बाहूबली रस्त्यावर!

पुणे  –  नवीन वर्षाच्या स्वागताला व्यसनमुक्तीचा संदेश देत दूध पिऊन तरुणाईसह नागरिकांनी स्वागत केले.यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्वतः रस्त्यावर येत दुधाचे वाटप करीत नववर्षाचे स्वागत दूध पिऊन करूया, असा संदेश दिला. एवढेच नाही तर दारू नको, दूध पिण्याचा संदेश देण्यासाठी बाहुबली व कटप्पा यांच्या वेशभूषेत कलाकारांनी दूध वाटप करीत फर्ग्युसन रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कात्रज दूध संघ, पुणे पोलीस आणि आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र यांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील, गुडलक चौकात नवतरुणाईसह नागरिकांनी दूध पिऊन नववर्षाच्या स्वागताच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी पुणेकरांना दुधाचे मोफत वाटप करण्यात आले.

या वेळी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मराठवाडा मित्रमंडळाच्या विद्यार्थ्यांकडून दोन पथनाट्ये सादर करून जनजागृती करण्यात आली. या वेळी विशाल कलानी व त्यांच्या सहकार्‍यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करीत या उपक्रमाचा आनंद द्विगुणित केला. संतोष केवडे यांनी कटप्पाच्या वेशभूषेत तर अतुल रोजेकर बाहुबलीच्या वेशभूषेत येऊन ‘दारू नको, दूध पिण्याचा संदेश’ देत जनजागृती केली.  याबरोबरच वाहतुकीचे नियम पाळा, हेल्मेट घाला अपघात टाळा, दारु पिऊन वाहने चालवू नका, असे संदेशही या वेळी देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button