breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

भारत-रशिया दरम्यान एके २०३ रायफलीच्या खरेदीचा करार

मास्को | भारत आणि रशिया यांच्यात एके २०३ रायफल खरेदीचा करार झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ यांच्या मॉस्को दौर्‍यादरम्यान हा करार करण्यात आला आहे. एके २०३ रायफल एके ४७ ची प्रगत आवृत्ती आहे. भारतीय सैन्याला ७ लाख ७० हजार एके २०३ रायफलची आवश्यकता आहे. यापैकी १ लाख एके २०३ रायफल रशियामधून आयात केल्या जातील.

कलाश्निकोव्ह ही जगातील सर्वात धोकादायक रायफल आहे. गेल्या ७० वर्षांपासून एके ४७ म्हणजे ऑटोमॅटिक कलाश्निकोव्ह हे जगातील सर्वात वेगवान ओळखले जाणारे शस्त्र आहे. एके मालिकेतील रायफल ऑपरेट करण्यापेक्षा सोपे आहे. फारच कमी वेळात शेकडो मीटर अंतरावर त्याच्या गोळ्या आक्रमण करतात.

कलाश्निकोव्ह रायफलचे लक्ष्य अचूक आहे आणि न थांबवता सतत गोळी चालविण्याची क्षमता आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात एके ४७ रायफल ही भारतीय सुरक्षा दलाची पहिली पसंती आहे. भारतीय लष्कराच्या अँटी टेरर फोर्स नॅशनल रायफल्सच्या ध्वजातही एके ४७ ला स्थान देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button