breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खाजगी कंपनीच्या संचालकांकडून व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

खाजगी कंपनीच्या संचालकांनी मिळून एका व्यावसायिकाची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2012 पासून आजपर्यंत चिखली येथे घडला.

लीलाधर वराडे (वय 53, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मे. रतन पॉवर प्रेसेस प्रा. लि. कंपनीच्या तीन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराडे यांची चिखली मधील कुदळवाडी येथे सप्तसतीज मेटाटेक प्रा. लि. ही कंपनी आहे. त्यांना 2012 मध्ये रतन मेक प्रेस 800 टन ही मशीन खरेदी करायची होती. या मशीनची किंमत सुमारे एक कोटी 50 लाख 98 हजार 936 रुपये आहे. त्यासाठी लागणारे पैसे त्यांनी रतन पॉवर प्रेस कंपनीला दिले. मात्र वराडे यांना रतन पॉवर प्रेस कंपनीने मशीन दिली नाही. सहा वर्ष उलटून देखील मशीन न मिळाल्याने वराडे यांनी रतन पॉवर प्रेस कंपनीच्या तीन संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button