breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या हुकूमशाही, भ्रष्ट कारभाराला कंटाळून नगरसेवकपदाचा राजीनामा : नगरसेविका माया बारणे

  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी धमाका करणार

पिपरी ।प्रतिनिधी

पिपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा भ्रष्ट ४ हुकूमशाही कारभार सुरू आहे. लाच प्रकरणी अटक झालेल्या स्थायी समिती अध्यक्षावर भाजपने कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्याचे समर्थन केले. हे शहराचे दुर्दैव असून भाजप पदाधिकारी भ्रष्टाचाराला साथ देतात हे स्पष्ट होते. महासभेत विचारण्यासाठीचे लेखी प्रश्न महापौरांकडून प्रश्न स्वीकारले जात नव्हते. भाजपच्या हुकूमशाही, भ्रष्ट कारभाराला कंटाळून भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे माया बारणे यांनी सांगितले.

दरम्यान, दि. ६ मार्च रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवड दौरा करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धमाका करणार असून, भाजपावाल्यांना धक्का बसेल, असा दावा अभय मांढरे यांनी केला आहे.

माया बारणे यांनी आज (शुक्रवारी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजीनामा देण्यामागची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. यावेळी नगरसेवक कैलास बारणे,  उद्योजक अभय मांढरे,  सचिन बारणे,. ऋषिकेश काशिद आणि विराज बारणे आदी उपस्थित होते

बारणे म्हणाल्या, महापालिकेच्या नागरवस्ती विभागाअंतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त केलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या ठेकेदार एजन्सीने भाजप पदाधिकारी आणि प्रशासनाच्या मदतीने २०२० -२१ या वर्षात ५७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यावर कारवाई होत नाही. भ्रष्टाचाराला भाजपचे समर्थन आहे. भूमिपुत्रांना भाजपमध्ये न्याय मिळाला नाही. लोकहिताच्या निर्णयावर सभागृहात बोलू दिले नाही.

महासभेत विचारण्यासाठीचे लेखी प्रश्न महापौरांकडून स्वीकारले जात नव्हते. हुकूमशाही पद्धतीने कारभार केला. शहरातील भाजपच्या नेतृत्वाला त्यांची हुजरेगिरी करणारे नगरसेवक पाहिजे होते. स्वावलंबी, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नगरसेवक भाजपला नको होते. २०१७ पासूनच चुकीच्या प्रकरणाविरोधात बोलू दिले जात नव्हते. त्यात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार शहरात होत असलेला अनियमित पाणीपुरवठा भामा आसखेड धरणातील पाणी शहाराला देण्याचे आलेले अपयश, पिंपरी-चिंचवड शहराच्या उर्वरित ४० टक्के भागासाठी १०६ कोटी ठेकेदाराला दिले तरी सुद्धा २४ टक्के पाणीपुरवठा केला नाही शहरात टँकर माफियांना पोसण्यासाठी केलेली कृत्रिम पाणी टंचाई, कोरोना काळात दिलेली वैदयकिय बिले, शहारातील बांधकाम व्यवसायिकांनी केलेली अनाधिकृत बांधकामे अशा विविध मुद्द्यांवर वारंवार आवाज उठविला. ते भाजप नेतृत्वाला रुचत नव्हते. तक्रारींची दखल घेतली नाही. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पाठींबा दिला नाही. पिंपरीचिंचवड महापालिका आशिया खंडात श्रीमंत असलेली नावलौकिक अशी महानगरपालिकेची प्रतिमा होती. भाजपच्या राजवटीत श्रीमंत महापालिका भ्रष्टाचारी महापालिका म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. त्यामुळे शहराची बदनामी होत आहे. महापालिका इतिहासात स्थायी समितीच्या सभा चालु असताना एसीबीने छापा टाकला. लाच प्रकरणी अटक झालेल्या स्थायी समिती अध्यक्षावर कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्याचे समर्थन केले. हे शहराचे दुर्दैव आहे, असेही बारणे म्हणाल्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button