breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

कोविड-19 वरील लस 2021 वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होणार नसल्याची WHO च्या प्रवक्त्यांची माहिती- Reuters रिपोर्ट्स

मुंबई: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसह रुग्णांचा झपाट्याने आकडा वाढत चालल्या दिसून आलेले आहे. कोरोना व्हायरस सारख्या महाभयंकर संकटाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व देशांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत जगभरातील वैज्ञानिक कोविड19 वरील लसी संदर्भात संशोधन करुन ती विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या वर्षाच्या अखेर पर्यंत कोरोनावरील लस येईल अशी चर्चा आहे.

आता डब्लूएचओ यांच्या एका प्रवक्त्याने कोविड19 वरील लस 2021 वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होणार नसल्याची माहिती दिलेली आहे. या बद्दल Reutres रिपोर्ट्सकडून अधिक स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनावरील लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस सर्वात पुढे असल्याचे मानले जात आहे. ड्रग ट्रायल्सला ट्रॅक करणाऱ्या एअरफिनिटी नावाच्या कंपनीच्या मते, सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत एस्ट्राजेनेका संबंधित परिणाम समोर येऊ शकतो असे म्हटले असून ती कोरोनापासून बचाव करु शकते की नाही हे स्पष्ट होणार आहे. या कंपनीने असा सुद्धा दावा केला आहे की, सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ब्रिटेनला 30 मिलियन म्हणजेच तीन करोड लसीचे ढोस देणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button