breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजप नेत्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; पुणे शिवसेनेची पोलिस आयुक्ताकडे तक्रार

पुणे |महाईन्यूज|

भाजपनं शिवसेनेची फसवणूक केली या माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याच्या आधारे भाजप आणि पक्षाच्या नेत्यांवर विश्वासघात, फसवणूक आणि बदनामी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी शिवसेनेनं केली आहे. पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं यासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं आहे.

राज्य विधीमंडळाच्या सभागृहात १२ मार्चला चर्चेदरम्यान माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात भाजपनं शिवसेनेला फसवले असा उल्लेख केला. हे सर्व विधिमंडळातील सदस्यांनी ऐकले. तसंच हे भाषण सभागृहाच्या पटलावर ध्वनिमुद्रित झाले आहे, असे शिवसेनेनं पत्रकात म्हटलं आहे. भाजपनं शिवसेनेची फसवणूक केल्याचं भाजपच्या नेत्यांनीच जाहीरपणे कबुल केलं. शिवसेनेकडून होणाऱ्या फसवणुकीच्या आरोपांना या वक्तव्यानं दुजोरा मिळाला आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही असं कधीच बोललो नव्हतो, असं म्हणत आजपर्यंत भाजप आणि नेत्यांनी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. सुधीर मुनगंटीवार यांच्या राज्य विधिमंडळाच्या सभागृहातील वक्तव्याच्या आधारे भाजप आणि संबंधित नेत्यांवर विश्वासघात, फसवणूक आणि बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेनं पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button