breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना संर्दभात चुकीचे मेसेज पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई, पोलिसांचा इशारा

पिंपरी |महाईन्यूज|

करोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणारे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात असून, यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांचा सायबर विभाग सरसावला आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी सनियंत्रक म्हणून गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली असून, चुकीचे मेसेज पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

करोना विषाणूने भारतातच नव्हे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही शिरकाव केला आहे. याबाबत सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्या बातम्यांचा पाऊस पडत आहे. सोशल मीडियावर आलेल्या ‘पोस्ट’ची कोणतीही शहानिशा न करता नेटकरी ती ‘पोस्ट’ आहे तशी ‘फॉरवर्ड ‘करीत आहेत. परिणामी करोनाबाबत नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

करोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काही खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशा पोस्ट जाणीवपूर्वक व्हायरल केल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button