TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भंडारा गोदिंया जिल्हापरिषद आणि १०५ नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक

या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

राज्यात १०५ नगरपंचायत आणि भंडारा गोदिंया जिल्हापरिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी प्रचाराच्या फेऱ्या संपल्यानंतर मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे नगर पंचायत निवडणूकीत अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र आले नसल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजही ओबीसी होते; महादेव जानकरांचं वक्तव्य
छत्रपती शिवाजी महाराजही ओबीसी होते; महादेव जानकरांचं वक्तव्य
कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महापालिकेकडूनच ओला-सुका कचऱ्याचे एकत्रित संकलन
कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महापालिकेकडूनच ओला-सुका कचऱ्याचे एकत्रित संकलन
मनपाच्या मालकीचा भूखंड व्यावसायिकाच्या घशात
मनपाच्या मालकीचा भूखंड व्यावसायिकाच्या घशात
लातूर महापालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा
लातूर महापालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा
अलिबाग- रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. स्थानिक पातळ्यांवर महा विकास आघाडीचा पॅटर्न राबविण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आल्याने, पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे स्थानिक पातळीवर सोयीस्कर आघाड्यांचा करण्यावर राजकीय पक्षांनी भर दिला आहे.

या प्रमुख नगरपंचायतीच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष

राज्यातील मंडणगड, दापोली (रत्नागिरी), कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ (सिंधुदुर्ग), देहू (पुणे), लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी (सातारा), कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ (सांगली), सोलापूरमधील माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर वैराग, नातेपुते या नगरपंचायतीच्या निवडणुकींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

तसेच भंडारा गोंदिया जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती नगर पंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ३९ जागासाठी पंचायत समितीच्या ७९ जागा तर नगर पंचायतिच्या ३९ जागासाठी तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४३ जागा नगर पंचायतीच्या ८९ जागा तर पंचायत समितीच्या ४५ जागासाठी हे मतदान होत आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक

ओबीसी आरक्षणामुळे नगरपंचायतींसह सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव राज्य मंत्रीमंडळाने केला होता, न्यायालयाने मात्र इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला नकार दिल्याने निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या आदेशानुसारच ओबीसी आरक्षण रद्द करुन निवडणूक घेण्याचे जाहीर केले. ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याबाबत आयोगाकडूनही काहीही सूचना न आल्याने ओबीसी वगळता इतर जागांसाठी नियोजनानुसार नगरपंचायत निवडणूका होत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button