breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; एकाच दिवशी सहा दुचाकी चोरीला

पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट वाढलेला दिसून येत आहे. शहराच्या विविध भागातून अज्ञात चोरट्यांनी सहा दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत रविवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी भोसरी मधील डायना के ऑटोमोटीव्ह स्टॅम्पिंग प्रा ली या कंपनीच्या परिसरातून विठ्ठल परेशराम पवार (वय 64, रा. गणेश पेठ, पुणे) यांची 30 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 12 / आर यु 1944) चोरट्यांनी चोरून नेली. तर निगडी पोलीस ठाण्यात साईनाथ राजेश कांबळे (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची मोपेड दुचाकी (एम एच 03 / बी यु 8773) चोरट्यांनी अंकुश चौक, निगडी मधून 9 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता चोरून नेली.

अभिजित अंकुश भंडारी (वय 23) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भंडारी यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 09 / सी टी 8433) चोरट्यांनी 9 जानेवारी दुपारी अडीच वाजता म्हाळुंगे नांदे रोडवरील व्ही टी पी ऑफिस जवळून चोरून नेली. तसेच तुषार बाळासाहेब बारमुख (वय 35, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ए एफ 6086) 9 जानेवारी रोजी रात्री साडेबारा ते सकाळी आठ या कालावधीत त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रियाजुद्दीन मनोद्दीन मनियार (वय 30, रा. थेरगाव) आणि सौम्या श्रीधर नायर (वय 29, रा. पिंपळे गुरव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनियार यांची 48 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एच व्ही 9577) त्यांच्या घराजवळून चोरून नेली. तर नायर यांची 35 हजारांची दुचाकी (एम एच 04 / बी एम 6606) घराजवळून चोरीला गेली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button