breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये 41 व्यक्तींचे घसातील द्रव्याचे नमुने तपासणी पाठविले

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात आज (शुक्रवारी) तब्बल 41 नागरिकांच्या घशातील द्रव्याचे नमुने पुण्यातील लॅबकडे तपासणीस पाठविण्यात आले आहेत. तसेच तीन पाॅझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असून कोरोना संशयित म्हणून दोघांना दाखल केलेल्या प्रवाशाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिली.

त्यांनी प्रसिध्दी पत्रकांत म्हटले की, यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल असलेल्या तीन पाॅझिटिव्ह नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. त्या रुग्णावर आयसोलेशन विभागात उपचार सुरु आहेत. सदरील रुग्णांच्या संर्पकात आलेल्या नातेवाईक, घरातील व्यक्तींना घरीच थांबण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सर्वांचे घशातील द्रव्याचे नमुने पुण्याच्या लॅबकडे पाठविले आहेत.

12 मार्च रोजी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दोघाना दाखल केले होते. त्या रुग्णांचे घशातील द्रव्ये तपासणी पाठविण्यात आले. मात्र, त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडले आहे. 13 मार्च रोजी भोसरीतील महापालिकेच्या रुग्णालयात 60 खाटांचे विलगीकरण कक्ष पुर्णपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथील डाॅक्टर, कर्मचारी व अन्य सोयी-सुविधा देखील उपलब्ध केलेल्या आहेत. तसेच आज तब्बल 41 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, शहरातील सर्व खासगी डाॅक्टर आणि वैद्यकीय संघटनाना कोरोना बाधित अथवा संशयित नागरिकांची माहिती तातडीने पिंपरी महापालिका वैद्यकीय कक्षाकडे सादर करण्याच्या सुचना केलेल्या आहेत. त्यांची बैठक घेवून तशा सुचना आयुक्त हर्डिकर यांनी दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button