breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भाजपा आमदार म्हणतात, ‘संस्कारच बलात्कार रोखू शकतात, मुलींवर चांगले संस्कार करावे’

लखनऊ | उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांकडून मोदी सरकार आणि व्यवस्थेवर सवाल उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे मोदी सरकारकडून विरोधकांवर राजकारण करण्याचा आरोप लावला जात आहे. अशा संतप्त वातावरणात भाजपा आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे.

‘चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात’, असे म्हणत ‘आपल्या तरुण मुलींवर चांगले संस्कार घडवणे त्यांना शालीन राहण्यास शिकवणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे’, असे धक्कादायक आणि संतापजनक विधान भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बलिया विधानसभा मतदसंघातील आमदार आहेत.

पत्रकारांनी हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुक्तफळे उधळली. रामराज्य सुरू आहे पण अशाही रामराज्यात बलात्काराच्या घटना घडत आहेत, असा सवाल सुरेंद्र सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावर सिंह म्हणाले की, ‘मी आमदार तर आहेच, पण एक शिक्षकही आहे. अशा घटना या संस्कारामुळे थांबू शकतील, त्या काही सरकार किंवा तलवारीमुळे थांबणार नाही. आपल्या तरुणी मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात.’

त्याचबरोबर ‘हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. सुरक्षा पुरवणे जर सरकारची जबाबदारी असेल तर प्रत्येक कुटुंबाला आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे हा त्यांचा धर्म आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रुप देऊ शकतात. त्यासाठी दुसरे कोणीही समोर येणार नाही’, असेही सुरेंद्र सिंह म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button