breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही’; चाकणकर यांनी लोणीकरांना झापलं

मुंबई | महाईन्यूज

माजी मंत्री आणि भाजपाचे नेते बबनराव लोणीकर हे महिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लोणीकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

जीजाऊ-सावित्रीच्या लेकी हिरोईन आहेतच. याची काळजी तुम्ही करु नका, पण तुमच्यासारखे व्हिलन आजूबाजूला असतील तर त्यांचा सुपडा साप करायला आम्हाला वेळ लागणार नाही.सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही. त्यामुळे बोलताना जरा भान ठेवा आणि काही वक्तव्य करताना जबाबदारीने करा, असं म्हणत चाकणकर यांनी लोणीकरांना झापलेलं आहे.

https://www.facebook.com/rupali.chakankar/posts/2812698592153779
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button