breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग” अशी सध्या सचिन सावंत यांची गत! प्रविण दरेकरांचा घणाघात

मुंबई |

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं. सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष यावरून भाजपाला धारेवर धरताना दिसत आहेत. तर भाजपाकडून महाविकास आघाडीला जबाबदार धरलं जात आहे. या वादात आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीसाठी वेळ न दिल्याच्या मुद्द्याची भर पडली आहे. यावरून आता राजकीय खडाजंगी होताना दिसत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता विधान परिषद विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ “उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग”, अशी गत सध्या सचिन सावंत यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात! मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका! आरक्षण वाचवणं जमलं नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा!” असं प्रविण दरेकरांनी ट्विटद्वार म्हटलं आहे.

https://twitter.com/mipravindarekar/status/1397461417364647936?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1397461417364647936%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra-news%2Fpravin-darekar-criticizes-congress-spokesperson-sachin-sawant-msr-87-2481189%2F

तर, “चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारं आहे,” अशी टीका सावंत यांनी केलेली आहे. तसेच, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानांतर त्यांच्यावर निशाणा साधत, “मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत – १. मोदींची विषयांची समज फार कमी आहे. २. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. ३. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे.” असं देखील सचिन सावंत यांनी या अगोदर ट्विट केलेलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button