breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे: ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर जमावबंदी लागू

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी टाळण्याचे आव्हान प्रशासना समोर उभे आहे. त्यामुळेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर नववर्षाच्या जल्लोष करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पर्यटनस्थळी रात्र जमावबंदी आदेश जारी केला. शुक्रवार 25 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू राहणार आहे. पुणे ,पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रात रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी ग्रामीण भागात गर्दी होण्याची शक्यता आहे.

तसेच नववर्षाच्या निमित्ताने एमटीडीसीच्या mtdc सर्व निवासस्थानांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत. 31 डिसेंबरला या ठिकाणी सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. मात्र हे कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत.

वाचाः पुण्यातील चित्रपटाशी संबंधित चार संस्थांचे विलिनीकरण

तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी या नगरपरिषदांचा भाग,तळेगाव, चाकण midc,हिंजवडी आयटी पार्क तसंच लोणावळा,अॅम्बी व्हॅली, लवासा, भुशी डॅम, मुळशी धरण, ताम्हिणी घाट, सिंहगड रस्ता, खडकवासला या पर्यटनस्थळांसह मावळ, मुळशी आणि हवेली तालुके याशिवाय विविध फार्म हाऊस, निवासस्थाने या ठिकाणी रात्र जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरेगाव भीमासह अकरा गावामध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 पर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button