breaking-newsराष्ट्रिय

भाजपचे माजी खासदार चंदन मित्रा तृणमुल मध्ये

कोलकाता – भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेले माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमुल कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत कॉंग्रेसच्या चार आमदारांनीही तृणमुल कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. ज्या कॉंग्रेस आमदारांनी तृणमुल मध्ये प्रवेश केला त्यांची नावे समर मुखर्जी, अबु ताहेर, सबिना यासमीन आणि अख्रुझमान अशी आहेत.

चंदन मित्रा हे भाजपकडून दोन वेळेला राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची राज्यसभेची मुदत नुकतीच संपली आहे. त्यानंतर पक्षात आपल्याला डावलले जात आहे असा आरोप करून त्यांनी नुकताच भाजपचा राजीनामा दिला होता. पण ते नेमक्‍या कोणत्या पक्षात जाणार हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले होते. पण आज अखेर त्यांनी तृणमुल मध्ये प्रवेश केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button