breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवरात्रौत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार तयारी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

नवरात्रौत्सवासाठी पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार तयारी झाली असून, शहर उत्सवासाठी सज्ज झाले आहे. शहरातील देवींच्या विविध मंदिरांमध्ये रंगरंगोटीचे काम करण्यात आले आहे. उत्सवकाळात होणाऱ्या गर्दीचा विचार करून त्या ठिकाणी मांडव घालण्याचेही काम पूर्ण झाले आहे. शहरात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज रविवारी (२९ सप्टेंबर) घटस्थापना होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची तयारी उत्साहात केली जाते. शहरातील अनेक मंडळांमध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, निगडी परिसरातील मंदिरांमध्ये दररोज भजन, कीर्तन, जागरण आदी कार्यक्रम होणार आहेत. शहरात नवरात्रीनिमित्त परिसरातील सर्व मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

नवरात्रौत्सवात विविध मंडळांतर्फे दांडिया आणि गरबा नृत्याचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी गरबा नृत्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. गरबा, दांडियासाठी विविध प्रकारचे आकर्षक पोशाख बाजारात उपलब्ध झाले आहेत. ऑक्सडाइजचे कानातले, बंजारा नेकलेस, झुमके, कंडोरा, पैंजण, बांगड्या, वाकी खरेदीला तरुणी बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. घटस्थापनेसाठी बाजारात फुले, पूजेसाठीचे सामान आणि नारळ घेण्यासाठी महिला वर्गाचीही बाजारात गर्दी झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button