breaking-newsक्रिडा

भर मैदानात निघाली पॅन्ट, तरीही केलं रन आऊट

खेळात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाप्रति निष्ठा असणं अत्यंत आवश्यक असते. दुखापतग्रस्त असताना खेळाप्रति असलेली निष्ठा दाखवत खेळ खेळणाऱ्या अनेक खेळाडूंची उदाहरणे दिली जातात. पण ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नस लाबुशेन हा एका वेगळ्याच पद्धतीच्या खेळाप्रति असलेल्या निष्ठेमुळे चर्चेत आला आहे. एका सामन्यात फिल्डींग करताना भर मैदानात पॅन्ट निघूनही त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला रन आऊट केल्याची चर्चा रंगली आहे.

क्विन्सलँड विरूद्ध व्हिक्टोरिया यांच्यात मार्श कप स्पर्धेतील सामना सुरू होता. या सामन्यात मार्नस लाबुशेन याची फिल्डींगमधील निष्ठा दिसून आली. सामन्याच्या २९ व्या षटकात फलंदाजाने चेंडू टाेलवला आणि एक चाेरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न फसला. मार्नस लाबुशेनने चपळतेने चेंडू अडवून यष्टीरक्षकाकडे फेकला आणि फलंदाजाला धावबाद केले. पण या दरम्यान चेंडू अडवताना लाबुशेनची पॅन्ट घसरली अन भर मैदानात त्याच्यावर नको ती वेळ ओढवली. पण त्या अवस्थेतदेखील त्याने चेंडू फेकला आणि नंतर पॅन्ट परिधान करून स्वत:च हसत पुन्हा फिल्डींगसाठी उभा राहिला.

https://www.instagram.com/cricketcomau/?utm_source=ig_embed

ऑस्ट्रेलिया क्रिकेटने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात पॅन्ट नसली तरीही काळजीचे कारण नाही. रन आऊट तर झालाच, अशी मिश्कील कॅप्शन देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून चाहते त्यावर भन्नाट रिप्लायदेखील देताना दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button