breaking-newsराष्ट्रिय

राफेल ‘शस्त्रपूजा’ प्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले….

राफेल पूजा प्रकरणावरुन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता त्यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. फ्रान्सकडून पहिले राफेल विमान घेतल्यानंतर ते गुरुवारी भारतात परतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या वादावर आपली भुमिका स्पष्ट केली.

राजनाथ म्हणाले, “त्यावेळी मी तेच केले जे मला योग्य वाटले. ही आमची श्रद्धा असून एक महाशक्ती आहे. या गोष्टींवर माझा लहानपणापासून विश्वास आहे. मला माहिती आहे की काँग्रेस पक्षातही यावरुन मतभेद आहेत. त्यामुळे त्यांच्या भुमिकेवर सर्वांचे एकमत असावे हे गरजेचे नाही. सर्व धर्मांच्या लोकांना आपल्या श्रद्धांनुसार, प्रार्थनेचा अधिकार आहे. जर इतर कोणी असे केले असते तर मी त्यावर आक्षेप घेतला नसता.”

विजयादशमीच्या दिवशी राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये राफेल विमानाची शस्त्रपूजा म्हणून पूजा केली होती. त्यावेळी त्यांनी विमानावर ओम चिन्ह काढत पूजा केली होती. यावेळी त्यांनी राफेलच्या सुरक्षेसाठी विमानाच्या दोन्ही चाकांखाली लिंबू आणि नारळ ठेवला होता. त्याच्या या कृतीचे फोटोही प्रसिद्ध करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button