breaking-newsमनोरंजन

मुलांना सेक्स संदर्भात सांगताना पालकांनी ‘हा’ मार्ग निवडावा; कंगनाचा उपदेश

मुद्दा कुठलाही असो, त्यावर आपलं परखड मत मांडण्यासाठी अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात शरीरसंबंधाबाबत वक्तव्य केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी कंगनाने तिच्या खासगी आयुष्याविषयीही खुलासा केला.

शरीरसंबंधाबाबत बोलताना आपल्या देशात उगाच त्याचा बाऊ केला जातो, असं सांगताना कंगना म्हणाली, ”सेक्स हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. लैंगिक सुखाची गरज असेल तर ते करायला हवं. त्याबाबत संकोच बाळगण्याचं काहीच कारण नाही. तरुणाईने सुरक्षित शरीरसंबंध ठेवावेत. सेक्शुअल पार्टनर बदलल्याने त्याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात.”

सेक्शुअली अॅक्टिव्ह असल्याचे कळल्यावर पालकांची काय प्रतिक्रिया होती, याचाही खुलासा कंगनाने या मुलाखतीत केला. ”माझ्या आई-वडिलांना जेव्हा कळलं की मी सेक्शुअली अॅक्टिव्ह आहे, तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. पालकांनी ‘सेक्स’ या विषयाचा बाऊ करण्यापेक्षा सुरक्षित शरीरसंबंध आणि त्याविषयीची माहिती मुलांना द्यावी असं मला वाटतं. आपल्या देशात या विषयावर मोकळेपणाने बोलले जात नाही. पण ते बोलण्याची गरज आहे,” असं ती म्हणाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button