breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘मनाली ट्रिपमधील एका चुकीमुळे HIV टेस्ट केली’; शिखर धवनचा मोठा खुलासा

१४-१५ वर्षांचा असताना मनाली ट्रिपला गेलो होतो

दिल्ली : भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनने एका मुलाखतील एचआयव्ही ट्स्टेबाबत मोठा खुलासा केला आहे. मनाली ट्रिपला जाऊन आल्यानंतर खूपच घाबरलो होतो. इतकंच भीतीपोटी एचआयव्ही टेस्ट करण्याचा निर्णय घेतला, असं गब्बर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवन म्हणाला.

भारतीय संघातील अनेक खेळाडूंच्या शरीरावर टॅटू गोंदलेले आहेत. शिखर धवनलाही टॅटू गोंदवायला खूप आवडतं. शिखरने सांगितलं की, १४-१५ वर्षांचा असताना मनाली ट्रिपला गेलो होतो. या ट्रिपमध्ये घरच्यांना न सांगता पाठीवर टॅटू गोंदवला. इतकंच काय तर ३-४ महिने टॅटू कोणाला दिसणार नाही याची काळजी घेतली.

आई वडिलांना याबद्दल कळल्यानंतर त्यांनी माझी चांगली धुलाई केली. टॅटू गोंदवल्यानंतर मी घाबरलो होतो. कारण त्या सुईने किती लोकांना गोंदवलं असेल, याची माहिती नव्हती. त्यामुळे एचआयव्ही टेस्ट करण्याचा निर्णय घेतला, असं शिखर धवन म्हणाला.

एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याचा जीव भांड्यात पडला. मी पहिला टॅटू पाठीवर गोंदवला होता. एका विंचूचा हा टॅटू होता. आता अंगावर बरेच टॅटू आहेत. यात भगवान शिव, अर्जुन यांचे टॅटू आहेत. अर्जुन एक उत्तम तीरंदाज होता म्हणून मी त्याचा टॅटू गोंदवला आहे, असं शिखर धवन म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button