breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेरगावमध्ये उद्यानांची दुरावस्था, अधिका-यांचे दुर्लक्ष: खासदार श्रीरंग बारणे

खासदार बारणे यांच्याकडून अधिका-यांसह थेरगावातील उद्यान, तलावाची पाहणी

पिंपरी : थेरगावातील लक्ष्मीबाई बारणे उद्यान, केजूदेवी बोट क्लब, खिंवसरा पाटील जलतरण तलावाची दुरावस्था झाली आहे. साहित्य अस्ताव्यस्थ पडले. ठेकेदार केवळ बीले उकाळण्याचे काम करत असून, उद्यान विभागप्रमुखांचे दुर्लक्ष आहे. ठेकेदारकडील काम काढून महापालिकेने उद्यान चालविण्याची मागणी करत उद्यानांचा नागरिकांना फिरण्यासाठी नव्हे तर केवळ फोटोशुटसाठी उद्यान देऊन पैसे कमविले जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला.

खासदार बारणे यांनी अधिका-यांसह थेरगावातील उद्यान, तलावाची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील, सह शहर अभियंता मनोज सेठिया, उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे आदी उपस्थित होते. थेरगावातील लक्ष्मीबाई बारणे उद्यान, केजूदेवी बोट क्लब, खिंवसरा पाटील जलतरण तलावाची दयनीय अवस्था झाली आहे. ओपन जिमचे साहित्य तुटले आहे. बोट क्लबमध्ये कचरा साचला आहे.

नागरिक सातत्याने तक्रारी करत आहेत. परंतु, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ठेकेदार केवळ बिले घेण्यापुरते काम करतात. उद्यान विभागाचे लक्ष्य नाही. फोटोशुटसाठी उद्याने देऊन पैसे कमविण्याचा धंदा चालविला आहे. टवाळखोरांचा धिंगाणा असतो, उद्यानात मद्यप्राशन करत बसलेले असतात. तिथे सुरक्षारक्षक नाहीत. सर्वसामान्य नागरिक उद्यानात जाण्यास घाबरत आहेत.

ठेकेदाराकडून काम काढावे आणि महापालिकेने उद्यान चालवावे. रविकिरण घोडके हे केवळ नावापुरते उपायुक्त आहेत. ते कधी उद्यानांमध्ये जात नाहीत. त्यांचे कामावर लक्ष नाही. करोडे रुपये खर्च करुन बनविलेल्या उद्यांनाची प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दुरावस्था झाली आहे. तत्काळ उद्यानांची सुधारणा करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

लोकप्रतिनिधी नसल्याने अधिका-यांचा मनमानी कारभार

मागील दीड वर्षांपासून महापालिकेत नगरसेवक नाहीत. अधिका-यांना जाब विचारण्यासाठी कोण नाही. त्याचा गैरफायदा घेत मनमानी कारभार चालला आहे. याला लगाम घालण्याची आवश्यकता आहे. यासाठी गुरुवारी आयुक्तांना भेटणार असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button