breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

फेसबुक, ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई

वॉशिंग्टन – अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून तोडफोड केल्यानंतर ट्विटर आणि फेसबुककडून ट्रम्प यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट १२ तासांसाठी, तर फेसबुकने २४ तासांसाठी लॉक केलं आहे. तसेच नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारादेखील ट्विटरने दिला आहे. तसेच इन्स्टाग्रामनेही त्यांचे अकाऊंट २४ तासांसाठी लॉक केले आहे. कॅपिटॉल इमारतीत हिंसाचार सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीबाबात केलेल्या निराधार आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

वाचा :-अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; गोळीबारात महिलेचा मृत्यू

‘वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे तिन ट्वीट्स हटवावेत, अशी आमची मागणी आहे. नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि गंभीर उल्लंघन त्यांनी केले आहे’, असे ट्विटरने म्हटले आहे. तसेच ट्विट्स न हटवल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट लॉक राहील, असेही ट्विटरने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्प आपल्या @realDonaldTrump या ट्विटर अकाऊंटवरुन एकही ट्विट करू शकणार नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button