breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

JEE Advanced 2021 परीक्षेचा निकाल जाहीर; मृदूल अग्रवाल देशात पहिला

नवी दिल्ली – JEE Advanced 2021 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आपला निकाल jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना आपला ऍप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाकावी लागणार आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) अभियांत्रिकी, आर्किटेक्चर आणि नियोजन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेत यंदा जयपूरच्या मृदूल अग्रवालने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सोबतच त्याने आयआयटी-जेईई प्रवेश परीक्षेत आतापर्यंत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रमदेखील केला आहे. या परीक्षेत मृदूलने 360 पैकी 348 गुण मिळवले असून त्याची टक्केवारी 96.66 इतकी आहे. 2011 नंतरचे हे सर्वाधिक गुण आहेत. तर यंदा मुलींमधून काव्या चोप्राची बाजी मारली आहे.

दरम्यान, आता आर्किटेक्चर ऍप्टिट्यूड टेस्टसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेशासाठी समुपदेशन 16 ऑक्टोबरपासून सुरू होईल. मागील वर्षाप्रमाणे समुपदेशन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button