breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; गोळीबारात महिलेचा मृत्यू

वॉशिंग्टन – अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं राजकारण अद्यापही शांत होत नाही. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घालत हिंसाचार केला आहे. ट्रम्प यांचे समर्थक वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत एका महिला आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प यांचे समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात सुरक्षा असतानाही ट्रम्प समर्थक कर्फ्यूचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात इमारतीबाहेर जमले होते. बैठक सुरु असतानाच आंदोलकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आणि इमारतीत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये जवळपास चार तास झटापट झाली. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुन्हा एकदा कॅपिटॉल इमारतीभोवती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली. मात्र पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत एका महिला आंदोलकाचा मृत्यू झाला. या महिलेच्या खांद्याला गोळी लागली होती असे कळते आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून हिंसाचार करु नका असे सांगितले आहे. आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग आहोत असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर जो बायडेन यांनी सांगितले की, ‘कॅपिटल भवनावर जो गोंधळ आपण पाहिला आम्ही तसे नाही. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे’, असं म्हणत बायडेन यांनी त्यांचा रोष व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button