breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमनोरंजन

बीएबीएमसीची सोनू सूदविरोधात तक्रार, अनधिकृत हॉटेल सुरु केल्याचा ठपका

बीएमसीने सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोनू सूदने जुहूमधील सहा मजली राहिवाशी इमारतीत आवश्यक परवानगीशिवाय अनधिकृत हॉटेल सुरु केल्यामुळे एमआरटीपी कायद्याअंतर्गत सोनू सूदविरोधात तक्रार दाखल करावी, असं बीएमसीने जुहू पोलिसांना सांगितलं आहे.

बीएमसीने चार जानेवारी रोजी जुहू पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “जुहूच्या एबी नायर रस्त्यावर असलेली शक्ती सागर इमारत या रहिवासी इमारतीत कोणत्याही आवश्यक परवानगीशिवाय हॉटेल सुरु केलं आहे. असे निदर्शनास आलं आहे की, सोनू सूद यांनी इमारतीचा काही भाग वाढवल्याचा, बदल केल्याचा आणि वापरात बदल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी, “इमारतीमधील बदलासाठी आपण महापालिकेकडे यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे. आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून (एमसीझेडएमए) मंजुरीसाठी थांबलं होतं,” असं सोनू सूदने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button