breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्लास्टिक बंदी : पालिकेचे अधिकारी निष्क्रिय म्हणून तोतया अधिका-यांनीच उघडली कारवाईची मोहीम

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शहरातील व्यवसायीक, दुकान, हॉटेल्समध्ये प्लास्टिकचा वापर होत असल्याने अशांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करत नाहीत. अधिकारी कारवाई करत नसल्याने कारवाईची ही मोहीम आता तोतया अधिका-यांनी हाती घेतली आहे. प्लास्टिक वापर होत असल्याचे पाहून संबंधित व्यवसायिकांकडून लाखो रुपये दंड गोळा केला जात आहे. असे तोतया कर्मचारी आढळून आल्यास खातरजमा करून व्यावसायिकांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी केली आहे.

राज्य शासनाने 23 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यात प्लास्टीक बंदी लागू केली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लास्टिक पिशव्या वापरणा-यांवर तिव्र कारवाई केली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या काळात ही कारवाई पूर्णपणे थंडावली. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांसह अन्य प्लास्टिक वस्तू वापरणा-यांची संख्या वाढली. पालिकेचे अधिकारी कारवाई करत नसल्यामुळे अशा व्यावसायिकांचे फावले गेल्याने नियमाचे उल्लंघन करणा-या अशा व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी तोतया अधिकारी, कर्मचा-यांनी मोहीम उघडल्याचे निदर्शनास आले आहे. हॉटेल व्यावसायीक, किराणा मालाचे दुकान, हातगाड्या, टप-या अशा तत्सम छोट्या-मोठ्या आस्थापनांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे समजताच ही तोतया गॅंग त्याठिकाणी सावज राखून आक्रमण करत असल्याची माहिती समोर आली आहे.

असे तोतया अधिकारी किंवा कर्मचारी पिपंरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय कर्मचारी असल्याचे सांगून व्यावसायिकांना त्रास देत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यवसायिक अथवा नागरिकांनी 9922501118 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button