breaking-newsआंतरराष्टीय

नवाज शरीफ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने घोषित केली डेडलाइन!

इस्लामाबाद (पाकिस्तान) – नवाज शरीफ प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने डेडलाइन घोषित केली आहे. पाकिस्तानचे पदभ्रष्ट पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरुद्ध असलेल्या भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणांची सुनावणी एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने एनएसी (नॅशनल अकाऊंटिबिलिटी कोर्ट) ला दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मियां साकिब निस्सार यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय खंडपीठाने नवाज शरीफ यांच्या विरुद्धच्या भ्रष्टाचार प्रकरणी वरीलप्रमाणे आदेश दिले आहेत. खंडपीठाने नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरीयम यांना लंडनला जाण्याची अनुमती दिली आहे. लंडनमध्ये श्रीमती शरीफ यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत.

मागील वर्षी जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवले होते. त्यानंतर नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात सप्टेंबर महिन्यात एनएसीमध्ये केस दाखल करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button