टेक -तंत्रताज्या घडामोडी

व्हॉट्सअ‍ॅपने आणले आपल्या युजर्ससाठी काही नवीन फीचर…पहा

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी काही नवीन फीचर आणले आहेत. ते कोणते खास फीचर आहेत ते पाहुयात…

डार्क मोड
WhatsApp ने ‘डार्क मोड’ हा फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केलीये. व्हॉट्सअ‍ॅपचे डार्कमोड फिचर सध्या काही मोजक्या युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे. अँड्राइड बीटा व्हर्जनवर काही दिवसांपूर्वीच हे फीचर उपलब्ध झालं आहे. सर्व युजर्सना हे फीचर उपलब्ध करून देण्यापूर्वी कंपनी त्याची सर्व स्तरावर चाचणी करत आहे. काही त्रुटी आढळून आल्यास त्या दुरुस्त करण्यात येणार आहेत.बीटा व्हर्जनमध्ये, डार्क मोड तीन पर्यायांसह येऊ शकतो. हा मोड चालू केल्यावर, पार्श्वभूमी काळी होईल आणि मजकूर पांढर्‍या रंगात दिसू लागेल.

ग्रुप इनवाइट फीचर
जर तुम्ही ग्रुपमध्ये अ‍ॅड होण्यास वैतागले असाल तर व्हॉट्सअ‍ॅपने एक खास फीचर आणले आहे, ज्यामुळे तुम्हाला न विचारता कोणीही ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाही. तुम्हाला कोणी ग्रुपमध्ये अ‍ॅड करायचे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. यासाठी तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन Everyone, my contacts आणि my contacts except या तीन पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकता.

रिमाइंडर फीचर
व्हॉट्सअ‍ॅपवर आता तुम्हाला रिमाइंडरचे देखील फीचर मिळणार आहे. या नवीन टूलद्वारे तुम्ही टास्क तयार करू शकता व तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर रिमाइंडर मिळेल. मात्र यासाठी युजर्सला Any.do डाउनलोड करावे लागेल. हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपशी कनेक्ट करावे लागेल. हे फीचर मोफत नसून, यासाठी तुम्हाला Any.do वर स्बस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

कॉल वेटिंग फीचर
हे फीचर आल्यानंतर युजर्सचे कोणतेही कॉल मिस होणार नाहीत. आता व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग दरम्यान युजर्सला कॉल वेटिंगचे नॉटिफिकेशन मिळेल. आता व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर बोलत असताना व्हॉट्अ‍ॅपवर दुसरा कॉल आल्यास युजर्सला तो रिसिव्ह अथवा कट करण्याचा पर्याय असेल.

2020 मध्ये आणखी काही फिचरस् येणार आहेत पाहुयात…

फेस अनलॉक
व्हॉट्सअपने अलीकडेच वापरकर्त्यांना त्यांनी केलेल्या चॅट फिंगरप्रिंटच्या मदतीने सुरक्षित करण्याचा पर्याय दिला आहे. पुढच्या वर्षी व्हॉट्सअॅप फेस अनलॉक फीचरसुद्धा देऊ शकेल. या बाबत प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तांनुसार या नव्या फीचरबाबत लिहिलेही गेले आहे. परंतु हे फीचर नेमके केव्हा सुरू केले जाईल याबद्दल काही स्पष्टता नाही.

डिसअपिअरिंग मेसेज
वापरकर्त्यांद्वारे निश्चित केलेल्या मर्यादेनंतर पाठविलेले किंवा प्राप्त केलेले संदेश ‘अदृश्य’ होतील असे आणखी एक नवे फीचर कंपनी देण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला हे फीचर फक्त ग्रुप अॅडमीनच वापरू शकणार आहे. हे फीचर सुरू करण्याचा पर्याय ग्रुप सेटिंगमध्ये दिला जाऊ शकतो.

निवडक मित्रांसाठी लास्ट सीन
आपल्या मित्रांनी आपला शेवटता मेसेज केव्हा चेक केला ते पाहता येणार आहे. काही मित्रांसाठी शेवटचा मेसेज पाहण्यासाठी लास्ट सीन पर्याय व्हॉट्सअप सुरू करणार आहे अस सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button