breaking-newsराष्ट्रिय

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या गोळीबारात १६ वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू

जम्मू- काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता असून सुरक्षा दलाने दगडफेक करणाऱ्या जमावावर केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. यात १६ वर्षांच्या मुलीचाही समावेश असून या घटनेत ५ जण जखमी झाले आहेत.

दक्षिण काश्मीरमधील कुलमाग जिल्ह्यातील मिशपोरा आणि हावुरा या भागांमधून सुरक्षा दलांनी काही तरुणांना ताब्यात घेतले. दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयातून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईला स्थानिकांनी विरोध दर्शवला. शनिवारी सकाळी स्थानिकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केल्याने परिस्थिती चिघळली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना बळाचा वापर करावा लागला. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात आठ जण जखमी झाले. जखमींना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.यातील तिघांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शाकीर अहमद (वय २२), इर्शाद अहमद (वय २०) आणि एका १६ वर्षांची अंदलीब अशी या मृतांची नावे आहेत.

काश्मीर खोऱ्यात आज (शनिवारी) बंदची हाक देण्यात आली असून फुटिरतावादी नेत्यांना ताब्याात घेतल्याने बंदसदृश परिस्थिती आहे. रविवारपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button