breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

झोपेच्या गोळ्या घेऊन ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने केला आत्महत्येचा प्रयत्न

| महाईन्यूज

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जयश्रीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. झोपेच्या अतिरिक्त गोळ्या घेत जयश्रीने जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने असं का केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु या प्रकारानंतर संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये या एकाच गोष्टीची चर्चा सुरु झालेली आहे. जयश्रीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली होती. या क्लिपमध्ये ती तिच्या मित्र-परिवाराला अखेरचा निरोप देत असून तिच्या संघर्षाच्या काळात ज्यांनी तिला मदत केली. त्यांचे आभार मानलेले आहेत. सध्या तिची ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जयश्री बऱ्याच दिवसांपासून पती इश्वरमुळे चर्चेत होती. बऱ्याचशा मुलाखतींमध्ये ती पतीच्या अफेअरवर खुलेपणाने व्यक्त झालेली होती. आपल्या पतीचं अभिनेत्री महालक्ष्मीसोबत अफेअर असल्याचं तिचं म्हणणं आहे. तसंच इश्वरने आपल्याकडून लाखो रुपये घेतले असून तो पैसे परत करण्यास नकार देत असल्याचंही तिचं म्हणणं होतं. मात्र हे सारे आरोप इश्वर यांनी फेटाळून लावलेले आहेत. त्यामुळे कदाचित याच कारणामुळे जयश्रीने आत्महत्या करण्याचं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button