breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा

चार लाख 77 हजार 40 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिध्द

पिंपरी |महाईन्यूज|

पुणे जिल्ह्यात सर्वांत मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ ठरला असून चार लाख 77 हजार 40 मतदारांची संख्या आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची अंतिम मतदारयादी गुरुवारी (दि.31) प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवीन नावे नोंदविण्याबरोबरच, पत्त्यात बदल, नावातील चुकीची दुरुस्ती आणि मयत मतदारांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे.

जिल्ह्यात लोकसंख्येनुसार सर्वाधिक मोठा मतदारसंघ चिंचवड विधानसभा ठरला आहे. या मतदारसंघात चार लाख 77 हजार 40 मतदारांची संख्या आहे. तर, पिंपरी मतदारसंघात तीन लाख 41 हजार 626 मतदार संख्या आहे. तर, भोसरी मतदारसंघात तीन लाख 99 हजार 400 मतदार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button