breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरीतून सहा उमेदवारांचे अर्ज अवैध, 29 उमेदवार रिंगणात

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी, मनसेसह सहा उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत, मनसेचे किसन कांबळेसह पाच उमेदवारांचे अर्ज अवैध झाले आहेत. 29 उमेदवारांचे 44 अर्ज वैद्य ठरले आहेत. दरम्यान, धर यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला आहे.

पिंपरी विधानसभा लढविण्यासाठी अंतिम मुदतीत तब्बल 35 उमेदवारांनी 51 अर्ज दाखल केले होते. या अर्जांची आज (शनिवारी) छाननी झाली. यामध्ये 35 पैकी 5 उमेदवारांचे सहा अर्ज अवैद्य ठरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून ए. बी. फॉर्म मिळालेल्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचा समावेश आहे. त्यांना जाहीर झालेली उमेदवारी राष्ट्रवादीने अचानक रद्द करून माजी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, बनसोडे यांनी शिलवंत यांच्या अगोदर उमेदवारी अर्ज भरल्याने बनसोडे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी ग्राह्य धरला आहे.

शिलवंत यांच्यासह मनसेचे किसन शंकर कांबळे, जनहित पक्षाचे अशोक रामचंद्र आल्हाट, जनता पार्टीचे डॉ. अभिजीत भालशंकर, अपक्ष वैशाली बबन देठे यांचे सहा अर्ज अवैद्य ठरविण्यात आले आहेत.

दरम्यान, मनसेचे उमेदवार किसन शंकर कांबळे यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पक्षाचा एबी फाॅर्म जोडून अर्ज बाद केल्याने न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button