breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

बीडमध्ये डॉ.मुंडे हॉस्पिटलवर छापा, आरोग्य विभागाची मोठी कारवाई

बीड – अवैध गर्भपाताच्या गुन्ह्यात जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या डॉ. सुदाम मुंडे याने बेकायदेशीरपणे दवाखाना सुरु ठेवला. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने शनिवारी मध्यरात्री सदरील दवाखान्यावर छापा मारला. यावेळी काही संशयास्पद साहित्य आणि औषधी सापडले असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, या दवाखान्यात कोरोनाच्या रुग्णांवर देखील उपचार सुरु होता असा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणात बीड जिल्हा न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे आणि डॉ. सरस्वती मुंडे आणि पीडितेचा पती महादेव पटेकरला दोषी ठरवले. न्यायालयाने डॉ. मुंडे दाम्पत्याने स्त्री भ्रूण हत्येचा कारखानाच उघडला होता, असं मत नोंदवत सर्व दोषींना 10 वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजार दंडाची शिक्षा सुनावली होती. मुंडे यांच्या रुग्णालयात 2012 साली एका महिलेची गर्भलिंगनिदान चाचणी करण्यात आली असता पोटातील बाळ मुलगी असल्याची स्पष्ट झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button