breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

आकुर्डीसह आदी परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त सकारात्मक!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी घेतली आयुक्त शेखर सिंह यांची भेट

पिंपरी : आकुर्डी, काळभोरनगर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, मोहननगर, शंकरनगरसह आदी परिसरातील विविध प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असून हे प्रश्न लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी दिली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांच्यासह शिष्टमंडळाने आयुक्त सिंह यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी शेखर काटे, प्रसाद कोलते, प्रतीक साळुंके, चेतन फेंगस, अक्षय माछरे, मंगेश असवले, तुषार ताम्हाणे, अजय तेलंग आदी युवक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आकुर्डी, काळभोरनगर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, मोहननगर, शंकरनगरसह आदी परिसरातील विविध प्रश्नांसंदर्भात आयुक्तांना काळभोर यांनी सविस्तर माहिती दिली.

याबाबत बोलताना विशाल काळभोर म्हणाले की, प्रभागातील विविध प्रश्नांसंदर्भात आपण जनसंवाद सभेमध्ये सातत्याने आवाज उठविला आहे. जे प्रश्न प्रभाग स्तरावरचे होते ते सुटले आहेत. मात्र, जे आयुक्त स्तरावरचे प्रश्न प्रलंबित आहेत. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांच्याकडे आपण गा-हाणे मांडले होते. त्यामुळेच अजितदादा आणि पार्थदादाच्या माध्यमातून आयुक्त सिंह यांची भेट घेतली.

हेही वाचा – Seema Haider : सीमा हैदर ‘या’ पक्षाकडून निवडणूक लढविणार!

रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर लगत असलेल्या खानी मधिल गार्डन, क्रीडांगण, महादेव मंदिर परिसर तसेच दशक्रिया विधी घाटाचे दुरुस्ती करुन तेथे बर्डव्हॅली गार्डन प्रमाणे सुशोभिकरण करणे, मोहननगर येथील राजे श्री शाहू महाराज जलतरण तलाव, व्हॅालीबॅाल, लाँगटेनिस, स्केटिंग मैदानाची दुरूस्ती करणे, प्रभाग क्र. १४ मधील अंतर्गत रस्ते दुरुस्त करुन स्पीडब्रेकर, दिशादर्शक फलक, आकर्षक विद्युत पोल, आकर्षक झाडे लावावी व रस्ता डांबरीकरण करावे.

काळभोरनगर येथील भुयारी मार्गातून होणाऱ्या धोकादायक रोड क्रॉसिंग संदर्भात योग्य त्या उपाययोजना करणे, ऐश्वर्यम सोसाटी लगत असलेल्या आरक्षित भूखंड आरक्षणनुसार विकसित करणे, रामनगर समता चौक ते पंतप्रधान आवास योजना मोहनगर येथील अनेक वर्ष प्रलंबित रस्त्याचे काम पूर्ण करणे, शंकरनगर येथील महात्मा जोतिबा फुले उद्यान नूतनीकरण, आकुर्डी, काळभोरनगर, चिंचवड परिसरातील कारखान्यामधून होणाऱ्या दुषित वायू प्रदूषण व रसायनयुक्त पाणी थेट नाल्यामधे सोडल्या मुळे परिसरातील नागरिकांना कुजट वासाने व श्वासनाचा त्रास होत आहे. याबाबत चौकशी व तपासणी करुन उचीत कारवाई करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशा विविध प्रश्नांवर आयुक्त सिंह यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. आयुक्त सर्व प्रश्न ऐकून लवकरच ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिल्याची माहिती विशाल काळभोर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button